सुशांत सिंह राजपूतची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्याचा खुलासा, काय म्हणालेला सुशांत त्याला?

 बॉलिवूडचा (Bollywood) सर्वात शांत आणि गुणी अभिनेता अशी दिवंगत सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) ओळख होती.

Sushant Singh Rajput Unfulfilled Desire: प्रतिक बब्बरनं अलीकडेच एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगितलं. प्रतिकनं सांगितलं की, ‘छिछोरे’च्या शुटिंगनंतर सुशांतला काही खास ठिकाणी जायचं होतं, ज्याबद्दल त्यानं सेटवर सांगितलं होतं.

 

बॉलिवूडचा (Bollywood) सर्वात शांत आणि गुणी अभिनेता

अशी दिवंगत सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) ओळख होती.

Related News

त्याच्या मृत्यूला तब्बल चाडेचार वर्ष लोटलीत, चाहते अजूनही त्याच्या आठवणींमध्ये हरवले आहेत.

एकीकडे चाहते त्याच्या आठवणीनं व्याकूळ होत आहेत,

तर दुसरीकडे अनेक चाहते त्याला न्याय देण्याची मागणीही करत आहेत. आता अभिनेता प्रतिक बब्बरनं (Prateik Babbar) सुशांत सिंह राजपूतबाबत खुलासा केला आहे.

प्रतिक बब्बरनं सुशांतसोबत 2019 मध्ये आलेल्या ‘छिछोरे’ चित्रपटात काम केलं होतं. अत्यंत दुःखद

बाब म्हणजे, ‘छिछोरे’ सुशांतच्या हयातीत रिलीज झालेला शेवटचा चित्रपट ठरला.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्यानं

आत्महत्या केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं. पण, त्यानंतर बराच गदारोळ झाला. कुणी सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या

म्हटलं तर कुणी हत्या म्हटलं. त्यानंतर सुशांतच मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. अजूनही

चाहते सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचं नेमकं काय झालं? याचा विचार करत आहेत.

प्रतिक बब्बरनं सांगितली, सुशांतची शेवटची इच्छा 

प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेक प्रतिक बब्बरनं ‘फिल्म ग्यान’ला मुलाखत दिली.

त्यावेळी बोलताना त्यानं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर भाष्य केलं. प्रतिक बब्बरनं सुशांतच्या शेवटच्या इच्छेबाबत सर्वांना सांगितलं.

‘छिछोरे’च्या शुटिंगनंतर सुशांतनं एकट्यानं अंटार्क्टिकाला जाण्याची चर्चा माझ्यासोबत केली होती. प्रतिक बब्बर सुशांतच्या फार जवळ नव्हता,

पण जेव्हा दोघे बास्केटबॉल सीन शूट करण्यासाठी थांबले होते, त्यावेळी दोघांमध्ये बोलणं झाल्याचं सांगितलं होतं.

यार शूटनंतर…; सुशांतनं प्रतिकला नेमकं काय सांगितलेलं? 

प्रतिक बब्बरनं सांगितलेलं की, सुशांत थोडा वेगळा होता. तो म्हणाला होता, ‘यार, शूटिंग संपल्यावर मी अंटार्क्टिकाला जाणार आहे.

‘ 2019 मध्ये सुशांतनं सोशल मीडियावर त्याच्या 50 स्वप्नांची यादी शेअर केली होती.

यामध्ये त्यानं विमान उडवणं, डाव्या हातानं क्रिकेट मॅच खेळणं आणि मुलांना

अवकाशाविषयी शिकवण्याच्या स्वप्नांचा उल्लेख त्यानं केला होता. पण दुर्दैवं म्हणजे

, सुशांतला 50 पैकी केवळ 13 स्वप्न पूर्ण करता आली. आणि आपली स्वप्न अर्ध्यावर सोडून सुशांत सिंह राजपूतनं एग्झिट घेतली.

Related News