सूर्यकुमार यादव नवा टी-२० चा कर्णधार

सूर्यकुमार

सूर्यकुमार यादव भारताचा नवा टी-२० कर्णधार असणार आहे.

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यातील टी मालिकेसाठी

सूर्यकुमारकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Related News

वनडे संघात कर्णधार रोहित आणि विराट कोहली हे अनुभवी शिलेदार आहेत.

हार्दिक टी संघाचा भाग आहे. दरम्यान दोन्ही मालिकांसाठी शुबमन गिलकडे

उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर

यांच्या मार्गदर्शनातील हा पहिलाच दौरा असणार आहे.

सूर्यकुमारने याआधीही भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे.

टी वर्ल्डकपविजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्माने फायनलनंतर

या प्रकारातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

रोहितच्या बरोबरीने विराट कोहलीनेही टी प्रकाराला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता.

यामुळे टीचं कर्णधारपद कोणाकडे असणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या.

हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवलं जाईल असे सुरुवातीचे आडाखे होते.

मात्र फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन सूर्यकुमारकडे टी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.

सूर्यकुमारने ६८ टी सामन्यात २३४० धावा केल्या असून

यामध्ये ४ शतकं आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याचा १६७.७५ हा स्ट्राईक रेट गोलंदाजांना धडकी भरवणारा आहे.

सध्याच्या घडीला टी जागतिक क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानी आहे.

दरम्यान कर्णधारपदी नसला तरी टी मालिकेसाठी हार्दिकची

भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

टी वर्ल्डकपविजेत्या संघातील ऋषभ पंत, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग,

मोहम्मद सिराज यांचं पुनरागमन झालं आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी युवा संघ पाठवण्यात आला होता.

त्या संघातील शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग,

संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, खलील अहमद

यांची श्रीलंका दौऱ्यातील टी संघात निवड झाली आहे.

श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी रोहित शर्माकडे सूत्रं असतील.

रोहित आणि विराट या मालिकेत खेळणार नाही अशा बातम्या समोर येत होत्या.

मात्र हे दोघेही संघाचा भाग आहेत. वनडे वर्ल्डकपमध्ये धावांची टांकसाळ उघडणारा

श्रेयस अय्यर संघाचा भाग आहे. वनडे मालिकेसाठी

हार्दिक पंड्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

Read also: https://ajinkyabharat.com/akola-fashionable-clothes-selling-shutter-gang-in-state/

Related News