आत्महत्या की हत्या, पोलिसांचा तपास सुरू

आत्महत्या

पुणे : शहरात गुन्हेगारीच्या घटनांची मालिका सुरू असतानाच पुण्यातील एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये 65 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेने विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले.सदर व्यक्तीचे नाव सुभाष कामठे असे असून ते फुरसुंगी परिसरातील रहिवासी आहेत. कामठे हे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.कामठे यांना दारूचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबत तपास सुरू आहे. परिसरात मात्र “दारूच्या नशेत पाण्यात उडी घेतली असावी” अशी चर्चा रंगली आहे.दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा गुन्हेगारी अँगलसह सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/chinese-sarvat-mothya-shatruvar-mat/