आत्महत्या केलेल्या थुट्टे दांपत्याच्या कुटुंबाला राहुल बोंद्रे व अशोक पडघान यांची आर्थिक मदत

आत्महत्या केलेल्या थुट्टे दांपत्याच्या कुटुंबाला राहुल बोंद्रे व अशोक पडघान यांची आर्थिक मदत

चिखली :- ( संदीप सावळे)

चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी दांपत्य गणेश श्रीराम थुट्टे आणि त्यांच्या पत्नी रंजना गणेश थुट्टे

यांनी दिनांक २४ जुलै रोजी हुमणी अळीने सोयाबीन पीक उद्धवस्त झाल्याने त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

गणेश थुट्टे आणि रंजना थुट्टे यांच्याकडे भरोसा शिवारात गट नं ३१७ ३२३ आणि ३२८ मध्ये पाच एकर कोरडवाहू जमीन होती,

त्यातच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. त्यांनी यावर्षी सोयाबीन आणि मका या पिकांची लागवड केली होती,

पण सोयाबीन पिकावर हुमणी अळीने अटॅक केल्याने त्यांचे संपूर्ण पिक उध्वस्त झाले,

हातचे पीक गेल्याने गांगलगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे २ लाख रुपये कर्ज आणि मेरा येथील

बँक ऑफ इंडियाचे ५ हजार रुपये कर्ज होते. ते कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत थुट्टे दांपत्य होते.

याच विवंचनेतून या दांपत्यांनी दि. २४ जुलै रोजी त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या थुट्टे कुटुंबांना अनेक पुढाऱ्यांनी भेट देऊन सांत्वन केले, पण मदतीचा हात कोणी दिला नाही,

अशातच मेरा सर्कलचे जिल्हा परिषदचे माजी सभापती अशोकराव पडघान यांनी थुट्टे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना ११ हजार रुपयांची मदत केली.

तर माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी ५१ हजार रुपये आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने २१ हजार रुपयांची मदत केली.

या दुर्दैवी घटनेनंतर अनेक नेते मंडळींनी भेट दिली, मात्र प्रत्यक्षात आर्थिक मदत फारच कमी झाली होती.

त्यामुळे माजी आमदार राहुल बोंद्रे आणि माजी सभापती अशोकराव पडघान आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी दिलेली

मदत समाजासाठी दिलासा देणारी ठरली असून, त्यांच्या या कृतीची गावात सर्वत्र चर्चा होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/congress-principal-president-yanchi-rigorous-action-magani/