प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा 2’ची तगडी कमाई

Netflix

Netflix ने खरेदी केले ओटीटीचे राइट्स

‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची

प्रचंड उत्सुकता आहे. ‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

Related News

येणार आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट

थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तगडी

कमाई केली आहे. ‘पुष्पा 2’चे ओटीटी हक्क विकले गेले आहेत. या डीलद्वारे

चित्रपटाच्या बजेटचा अर्धा खर्च भरून निघाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी

प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचे ओटीटी राइट्स विकत घेतले आहेत. चित्रपटाचे

निर्माते आणि नेटफ्लिक्स यांच्यात कोट्यवधी रुपयांचा करार झाला आहे.

अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे ओटीटी राइट्स तब्बल

270 कोटी रुपयांना विकले गेल्याचं कळतंय. त्यामुळे डिजिटल राइट्सच्याबाबतीत

हा चित्रपट देशातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटाचा

बजेट तब्बल 500 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे बजेटच्या अर्ध्यापेक्षा

जास्त रकमेची कमाई आताच झाली आहे. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा ओटीटीवर

विकला जाणारा चौथा सर्वांत महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/badrinath-national-highway-closed-due-to-heavy-rains-in-uttarakhand/

Related News