प्रहारने तात्काळ मदतीसाठी दिले इशारे !

अकोट-तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आफत!

“अकोट-तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आफत! ५०३ शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान; प्रहारने तात्काळ मदतीसाठी दिले इशारे!”

अकोट  – आकोट व तेल्हारा तालुक्यात १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतक-यांचे पिकांचे

प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतं तलावासारखी झाली असून,

अनेक शेतक-यांचे आर्थिक नुकसान गंभीर स्वरूपाचे आहे.

प्रहारने दिले निवेदन

प्रहार जनशक्ती पक्षने या बाबतीत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ

पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

 नुकसानाचे तपशील

  • काही गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरले

  • आधीच कर्जबाजीत असलेले शेतकरी आता गंभीर संकटात

  • एक पटवारीला दहा गावांचे पंचनामे करायला २५ दिवस लागणार, त्यामुळे तात्काळ ५०३ शेतकऱ्यांचे नुकसान दाखवून भरपाई द्यावी

  • प्रहारने इशारा दिला की, जर शासनाने दखल घेतली नाही, तर तिव्र आंदोलन होईल

 नागरिकांची अपेक्षा

तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत मिळावी, पिकांचे नुकसान भरून काढले जावे आणि घरांचेही

नुकसान पाहणी करून भरपाई दिली जावी, अशी स्थानिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read also :  https://ajinkyabharat.com/kotmadhyay-kadubai-kharat-yancha-bhimgitancha-grand-bang/