अकोट–दर्यापूर रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर सुरू असून, या कामादरम्यान रंभापूर फाटा ते हिवरखेड दरम्यान रस्त्यावर व पुलांवर धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. सतत धावणाऱ्या अवजड टिप्परमुळे रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले असून, पुलाला दोन्ही बाजूंनी तडे गेल्याचे निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रहार युवक जिल्हाध्यक्ष सुशील पुंडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित विभागाशी संपर्क साधून प्रहार स्टाईलने दबाव टाकला.
प्रहार संघटनेच्या आंदोलनात्मक हस्तक्षेपानंतर, अकोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. माळवे यांनीही ठेकेदाराशी संवाद साधत परिस्थितीचे गांभीर्य समजावले. त्यानंतर ठेकेदाराने तातडीने कामाला सुरुवात करत पूल दुरुस्त केला व वाहतूक सुरळीत केली.
या तत्परतेमुळे संभाव्य जीवितहानी टळली असून, नागरिकांनी सुशील पुंडकर यांचे आभार मानले व त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
रस्त्यावर मोठमोठे खड्डे:रंभापूर फाटा ते हिवरखेड रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. काही नागरिक किरकोळ जखमी तर काहींना गंभीर दुखापती झाल्या असून, काही अपघातांत मृत्यूही झाल्याचे समजते. यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
धुळीचे साम्राज्य:अकोट–दर्यापूर मार्गावर रस्त्याचे काम चालू असल्याने वाहनांच्या मागून उडणारी धूळ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. डोळ्यांचे व श्वासाचे आजार वाढत असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर पाणी मारण्याची मागणी केली आहे.
कामावरील व्यक्तीला चोप:पुलावर दोन्ही बाजूंनी झालेला खसका लक्षात घेता, वाहन पलटी होऊन मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्याला प्रहारच्या जिल्हाध्यक्षांनी चोप दिल्याची घटना घडली. यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती.
सतर्क नागरिक आणि जबाबदारीने हस्तक्षेप करणाऱ्या संघटनांमुळेच सार्वजनिक समस्यांकडे तातडीने लक्ष दिले जाते. सुशील पुंडकर यांची ही कृती भविष्यातील अनेक दुर्घटनांना अटकाव घालणारी ठरली आहे.
read also:https://ajinkyabharat.com/poetry/