पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2024,आरक्षण सोडत संपन्‍न.

महाराष्ट्र

महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाच्‍या असाधारण भाग 4 अ अन्वये

अकोला महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा प्रशासनाव्‍दारा एकुण 20

सदस्यांची शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

Related News

महाराष्ट्र शासनामार्फत प्रसिद्धी करण्यात आलेल्या पथ विक्रेता निवडणूक

नियम प्रणाली मध्ये नमुद केलेल्या एकुण 20 सदस्य संख्येमध्ये 8 (आठ)

पथ विक्रेता सदस्य असणार आहेत. सदरचे ८ (आठ) पथ विक्रेता सदस्य

पथ विक्रेत्यां मधून निवडणुकीद्वारे निवडून द्यावयाचे होते. महाराष्ट्र शासन

नगर विकास विभागाने असाधारण भाग चार माधील नगर पथ विक्रेता समिती

रचनेनुसार 11 ख (एक) मध्ये नमूद पथ विक्रेते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,

इमाव, अल्पसंख्याक, विकलांग व्यक्ती या प्रवर्गाचा उल्लेख केला आहे.

तसेच 1/3 आरक्षण हे महिलांना देण्यात यावे, असे नमूद केले आहे. तसेच

शासनाचे परिपत्रक क्रमांक नगर परिषद संचालनालय, परिपत्रक क्रमांक

नप्रसं/फेरीवाला धोरण/ का. 10/2022-23/2262 दि. 13 एप्रिल 2023 अन्वये

पथविक्रेता निवडणुकीसाठी आरक्षण सोडत करण्याची पध्दत निश्चित करुन दिली आहे.

त्यानुसार सर्व साधारण महिलांकरीता एक जागा पुर्वीच निश्चित असल्याने

उर्वरीत दोन जागा ह्या सर्व साधारण प्रवर्गाकरीता निश्चित आहेत.

उर्वरीत दोन महिलांकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इमाव,

अल्पसंख्याक, विकलांग या प्रवर्गातून निश्चित करण्याकरीता आज दि. 27

ऑगस्‍ट 2024 रोजी सकाळी 11 वा. अकोला महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मुख्‍य सभागृह येथे आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार

मा. निवडणूक निर्णय अधिकारी, मा. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे

उपस्थितीत महानगरपालिका प्राथमिक ऊर्दु कन्या शाळा क्रमांक 01 चे विद्यार्थी

मुजतबा खान मुस्तफा खान, कु. माहीन खान मुस्तफा खान यांचे हातून दोन चिठ्ठया

काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विकलांग (महिला) व अल्पसंख्याक (महिला)

या दोन महिलांच्या जागा राखीव करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पथविक्रेता

समिती सदस्य निवडणूक 2024 करीता खालील प्रमाणे आरक्षण राहील त्यामध्ये

अनुसुचीत जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्यांक (महिला),

विकलांग व्यक्ती (महिला), खुला प्रवर्ग महिला, खुला प्रवर्ग (सर्व साधारण)-दोन जागा राहणार आहे.

या आरक्षण सोडत कार्यक्रमास मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे, डॉ.मेघना वासनकर,

निवडणूक विभाग प्रमुख संजय चव्‍हाण, शहर प्रकल्‍प अधिकारी प्रमोद गायकवाड, संजय राजनकर,

कैलास ठाकुर, मैथिली बोबडे आणि पथविक्रेत्यांची उपस्थिती होती.

Read also: https://ajinkyabharat.com/tumbbad-will-be-released-again/

Related News