बेरिल वादळामुळे अमेरिकेत विध्वंस; ४ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील

अमेरिकेतील टेक्सास राज्यात बेरिल चक्रीवादळाने

प्रचंड हाहाकार माजवला आहे.

बेरील या शक्तिशाली वादळामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

वादळामुळे किमान ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

सुमारे ३० लाख घरे आणि व्यावसायिक आस्थापनांची वीज गेली आहे.

त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

यावरून वादळ किती भयंकर आहे, याचा अंदाज येतो.

राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने सोमवारी संध्याकाळी सांगितले की,

बेरील श्रेणी एक प्रकारातील वादळाने माटागोर्डाजवळ उग्र स्वरूप धारण केले.

ज्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शाळा, व्यावसायिक आस्थापने,

कार्यालये आणि वित्तीय संस्था बंद करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने सांगितले की, पूर्व टेक्सास,

पश्चिम लुइसियाना आणि अरकांससच्या काही भागात

पूर आणि जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे.

या दरम्यान घरांवर झाडे पडल्याने २ लोकांचा मृत्यू झाला.

तसेच पुराच्या पाण्यात अडकून

ह्यूस्टन पोलिस विभागातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

तर आग लागण्याच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे माहिती मिळाली आहे.

सध्या कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे मूल्यांकन सुरू केले आहे.

अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.

महापौर जॉन व्हिटमायर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,

“फक्त स्वच्छ आकाशामुळे धोका टळला आहे असे समजू नका.”

अजुनही परिस्थिती बिकट आहे. किती नुकसान झाले आहे

याबाबत सध्या काही सांगता येणार नाही.

गेल्या आठवड्यात, बेरील चक्रीवादळामुळे जमैका,

ग्रेनाडा, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्समध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

तिथे किमान १२ लोक मरण पावले.

वादळ सध्या ह्यूस्टनच्या नैऋत्येस सुमारे ७० मैल अंतरावर

१२ मैल प्रतितास वेगाने उत्तर-ईशान्य दिशेने सरकत आहे.

मंगळवार आणि बुधवारी हे वादळ लोअर मिसिसिपी व्हॅली

आणि नंतर ओहायो व्हॅलीकडे सरकण्याची शक्यता आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/rashtrachaya-netyane-karinala-mithi-marli-the-greatest-democracy/