तेल्हारा:प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या आदेशानुसार आणि प्रहार अपंग संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ सातव पाटील यांच्या शिफारसीनुसार, तेल्हारा तालुक्यातील संदीप गजानन ताथोड यांची प्रहार अपंग संघटना अकोला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबाबतचे नियुक्तीपत्र संदीप ताथोड यांनी बच्चुभाऊ कडु यांचे हस्ते, प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते व महासचिव राजेशभाऊ खारोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारले.
संदीप ताथोड हे गेल्या चार वर्षांपासून प्रहार संघटनेसोबत सक्रिय असून, अपंग, विधवा, शेतकरी आदी घटकांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. याआधी संघटनेने त्यांच्यावर तालुकाध्यक्ष आणि जिल्हा कार्याध्यक्ष यांसारखी जबाबदारीही दिली होती.
या नव्या निवडीनंतर संदीप ताथोड यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेंद्रभाऊ सातव पाटील, अकोला जिल्हाध्यक्ष मोईनभाऊ अली आणि महिला अध्यक्षा अरुणाताई काकड यांना दिले आहे.
या निवडीमुळे प्रहार संघटनेच्या ग्रामीण भागातील कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
read also:https://ajinkyabharat.com/vidyarthanancha-arogya-dhokya/