दिवाळीत होणारी एसटीची भाडेवाढ अखेर रद्द

दिवाळीत मिळणार दिलासा

दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक

महिन्याच्या कालावधीसाठी प्रवास भाड्यात १० टक्के वाढ

Related News

करण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेरी वगळता इतर सर्व

प्रकारच्या बसेसाठी २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू करण्यात

आली होती. ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार असल्याने

प्रवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ही

भाडेवाढ रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एसटी

प्रशासनाने प्रवास भाड्यात १० टक्के वाढ न करण्याचा निर्णय

घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दिवाळी सण काही दिवसांवर आलेला असतानाच एसटी

प्रशासनाकडून एसटीच्या प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा

निर्णय घेण्यात आला. दिवाळीनिमित्ताने गावी जाणाऱ्या किंवा

फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणाच्या शक्यता

होती. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार होती. मात्र

आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाची

हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना

मोठा दिलासा मिळणार आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या

प्रमाणात प्रवाशांची वाहतूक सुरु असते. त्याचा सर्वाधिक फायदा

हा एसटी प्रशासनाला होतो. कारणी खासगी वाहतूकीचे दर हे

सर्वसामान्यांना परवडवणारे नसतात. त्यामुळे प्रवासी एसटीचा

पर्याय स्विकारतात. मात्र एसटी प्रवाशाने दिवाळी दरम्यान, १०

टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यावेळी

एसटी प्रशासनाने या निर्यणाला स्थगिती दिली आहे. एसटी

प्रशासनाने यासंदर्भातील परिपत्रक देखील काढलं होतं. मात्र ही

हंगामी भाडेवाढ करण्याच्या निर्णय एसटी महामंडळाने रद्द केला

आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/india-ranked-105th-in-global-hunger-index/

Related News