राज्य महिला आयोगाचा कडक इशारा – आक्षेपार्ह वक्तव्यांवर तत्काळ दखल

महिलांवर अभद्र टिप्पणी केली तर थेट कारवाई

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य महिला आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना स्पष्ट इशारा दिला आहे. “प्रचारादरम्यान महिला उमेदवारांवर किंवा कोणत्याही महिलेवर अभद्र, आक्षेपार्ह टिप्पणी केल्यास थेट कारवाई केली जाईल” असे आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी सांगितले.

महिला आयोगाचा आवाहन

राज्य निवडणूक आयोगासोबतच महिला आयोगाने सर्वसामान्य महिलांनाही आवाहन केले आहे. कुठल्याही पक्षाचा पुरुष किंवा महिला उमेदवार महिलांविषयी चुकीची भाषा वापरत असेल, तर त्वरित महिला आयोगाशी संपर्क साधावा. यासाठी आयोगाच्या वेबसाइटवर अध्यक्षा व सदस्यांचे मोबाइल नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

निवडणूक काळातील वादग्रस्त भाषणांवर लक्ष

निवडणुकीच्या प्रचार काळात नेतेमंडळी वादग्रस्त वक्तव्य करतात. काहीवेळा महिलांविषयी अपमानास्पद भाषा वापरली जाते. यावर अंकुश ठेवण्यासाठी आयोगाने पावले उचलली आहेत. याबाबत आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सूचना पोहोचविण्याचा आग्रह केला आहे.

Related News

ऑक्टोबरपासून जनजागृती मोहीम

राज्य महिला आयोग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून विशेष मोहीम सुरू करणार आहे. आयोगाची टीम प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधेल, त्यांच्या अडचणी जाणून घेईल. विद्यार्थिनींनाही महिला उमेदवारांविषयी केलेल्या टिप्पणीबाबत माहिती द्यायला आवाहन करण्यात आले आहे.

आयोगाचे स्पष्ट निर्देश

  • महिला उमेदवारांच्या जीवनावर वैयक्तिक टीका नको.

  • धर्म, समुदाय आणि जातीवरून टिप्पणी नको.

  • उमेदवारांच्या कुटुंबीयांवर अपमानास्पद शब्द नकोत.

  • शिक्षण किंवा कामावर अवमानकारक टिप्पणी नको.

सर्व पक्षांनी काळजी घ्यावी

“निवडणूक प्रचारात महिलांविषयी अभद्र भाषा वापरणाऱ्यांची दखल तत्काळ घेतली जाईल. प्रत्येक राजकीय पक्षाने याची काटेकोर काळजी घ्यावी” असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी स्पष्ट केले.

read aslo : https://ajinkyabharat.com/angle-will-become-crores-of-mistress-angle/

Related News