राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकासह चालक रंगेहात

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकासह चालक रंगेहात

किराणा दुकानात दारू विक्रीसाठी व वाहन सोडविण्यासाठी १५ हजार लाच; उत्पादन शुल्क निरीक्षकासह चालक रंगेहात

अमरावती, दि. १४ :

किराणा दुकानात दारू विक्री करण्यासाठी आणि धाडीत जप्त केलेली दुचाकी सोडविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना

राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक व चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

ही कारवाई १४ ऑगस्ट रोजी दुपारी साडे दोन वाजताच्या सुमारास उत्पादन शुल्क कार्यालयात करण्यात आली.

रंगेहात पकडण्यात आलेल्यांची नावे सुरज रतनसिंग डाबेराव (५०), निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आणि संजय झिमाजी डेहाडे (५७), चालक अशी आहेत.

तक्रारदार यांचे किराणा दुकान असून, दुकानात दारू विक्रीचा व्यवसाय सुरू होता. भरारी पथकाने धाड टाकून त्यांची दुचाकी (क्र. एमएच-२९ एआर-१०३६) जप्त केली होती.

ती सोडविण्यासाठी तसेच महिन्याकाठी दारू विक्री करण्यासाठी आरोपींनी १५ हजार रुपये मागितले होते. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

पडताळणीनंतर पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पैसे स्वीकारताना दोन्ही आरोपींना राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या आवारातच रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मारोती जगतापसचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनिल किनगे यांच्या

पथकातील पोलिस निरीक्षक चित्रा मेसरे, सुजाता बनसोड, प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, महेंद्र साखरे आणि सतीश किटुकले यांनी केली.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/freedom-2/