सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच
बँकेतून कर्ज घ्यायचे असो सर्वसाधारणपणे नागरिकांना किंमान 100
रुपयांच्या स्टँप पेपरवरुन दस्तावेज तयार करता येत होतो. 100, 200
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
आणि 500 रुपयांच्या स्टँपवर नागरिकाचा दस्तावेज ग्राह्य धरला जात
होता. मात्र, यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टँप पेप इतिहासजमा
होणार आहेत. कारण, आता किमान 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी,
नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक
शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ
500 रुपयांचे स्टँप जारी केला जातील. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना
आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल
वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तहसील किंवा महसूल
कार्यलयात अवघ्या शंभर, दोनशे रुपयांत स्टँप केले जात. वैयक्तिक
कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह
साठेखतानंतरचे खरेदीखत, हक्क सोडपत्रासाठी आता पाचशे रुपयांचे
मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’
योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैरात केल्याने
अन्य योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसुली
उत्पन्न वाढविण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याची चर्चा महसूल खात्यांतर्गत
बोलली जात आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने लाडकी
बहीण योजनेसह विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली
आहे. त्यामुळे, आता महसूल वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग केला जात
आहेत. प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र, साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदीखत करताना
ते शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी आता शंभरऐवजी
पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयातील
कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यामध्ये,
कोणताही बदल झाला नसल्याचीही माहिती आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/big-push-by-bjp-in-pune-district/