राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे.
या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गट विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा सांगणार आहे.
तत्पूर्वी अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली बघायला मिळाली.
कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत दानवे यांनी सभागृहात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले.
मात्र बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट लाटल्याप्रकरणी कोर्टाने 2 वर्षे सक्तमजुरीची
शिक्षा ठोठावलेले माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही असल्याचं बघायला मिळालं.
दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे.
त्याचबरोबर या अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तसेच कृषी खात्यातील
घोटाळ्याच्या आरोपावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि त्यातच आता
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणासह महिलांच्या
सुरक्षेचा मुद्द्यांवरही सरकारला जाब विचारला जाणार आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/rohit-sharma-jada-ann-wit-progress-statement/