एसटीच्या चालक- वाहकाची ईमानदारी महिलेची मौल्यवान वस्तूची पर्स केली परत

एसटीच्या चालक- वाहकाची ईमानदारी महिलेची मौल्यवान वस्तूची पर्स केली परत

बार्शीटाकळी प्रतिनिधी

बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील एसटी वाहक मो. सुलतान, व चालक शहजाद या दोघांनी कर्तव्यावर

आपली जबाबदारी दाखवत एका महिलेचि बॅग परत केले आहे, मंगरूळपीर ते नंदुरबार कामगिरी करीत

असतांना खामगाव येथे पोहोचल्यानंतर गाडीमध्ये खूप गर्दी असल्यामुळे प्रवासी पर्स मध्ये चढले परंतु

काही जागेअभावी एक महिला खामगावलाच उतरून गेली त्यामुळे सदर महिलेची एक पर्स  गाडीमध्ये विसरून राहिली.

राहिलेल्या पर्स कडे कुणाचेही लक्ष नसतानाही वाहक सुलतान यांनी सदरची पर्स कुणाची आहे .

म्हणून पर्स मध्ये चौकशी केली असता कुणीही माझी आहे म्हणून म्हटले नाही काही वेळानंतर सदर पर्स ज्या महिलांची होती

त्या महिलेने चौकशी करून सुलतान यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांचाशी संपर्क साधून मी मागच्या गाडीमध्ये येत आहे .

त्यामुळे माझी पर्स सुरक्षित आपल्याकडे ठेवा मी म्हणून कळविले आणि सदर पर्समध्ये मौल्यवान वस्तू दागिने,

रोख रक्कम विसहजार रुपये तसेच मोबाईल आहे म्हणून सांगितले त्यांनी ती पर्स  सुरक्षित जवळ ठेवून भुसावळला वाहतूक

नियंत्रक यांच्या समक्ष त्यांना परत दिली, त्यामुळे प्रवाशी महीलाने चालाक शहजाद वाहक सुलतान यांचे आभार मानले.

आजही वाहक हा आपली जबाबदारी एक कर्तव्य, इमानदारी, माणुसकीचं नातं, म्हणून इमानदारीने कामगिरी करत असतो .

प्रवासी दैवत समजून प्रवाशांचा असलेला एसटी कर्मचाऱ्यावरील विश्वास चालक व वाहकांनी आपल्या कामगिरीतून सार्थ ठरत असतो.

प्रवाशांच्या विश्वासाला एसटी कर्मचारी हा तडा जाऊ देणार नाही याचे उत्तम हे उदाहरण आहे.

त्यानिमित्त शहजाद व सुलतान यांचे मंगरूळपीर आगारा तुन कौतुक होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-chhaya-jilha-executive-lonar-taluka-after/