एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोठा संघर्ष

15 सप्टेंबरला बीडमध्ये महामोर्च्याचा दणदणाट

बीडमध्ये बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात समावेश मिळवण्यासाठी ठाम भूमिकेने आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. सध्या बंजारा समाज VJNT प्रवर्गात असून, समाजाने हैदराबाद गॅझेटप्रमाणेच एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी जोरदारपणे करत आहे.या पार्श्वभूमीवर बीडमध्ये बंजारा समाजाची भव्य बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील विविध भागातील पदाधिकारी आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते. बैठकीत सामाजिक न्यायाची बातमी, आरक्षणाची गरज आणि सरकारने तत्काळ अधिसूचना जारी करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.बैठकीत सांगितले गेले की, बंजारा समाजाचे पारंपरिक स्थान, सामाजिक व आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांचा एसटी प्रवर्गात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. समाजाच्या भक्कम एकतेचा संदेश देण्यासाठी आणि न्यायासाठी 15 सप्टेंबर रोजी भव्य महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा पारंपरिक पद्धतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.मोर्च्याद्वारे बंजारा समाजाची आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार असून, राज्य सरकारने त्यांच्या मागण्या सकारात्मकपणे विचारात घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही सजगता दाखवून सुरक्षा व्यवस्था घट्ट केली असून शांततामय पद्धतीने मोर्चा पार पडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

read also :  https://ajinkyabharat.com/sansadhet-tarunani-entry-banana/