सेंट पॉल्सचे तायक्वांदो खेळाडू ठरले चॅम्पियन्स!

सेंट पॉल्सचे तायक्वांदो खेळाडू ठरले चॅम्पियन्स!

अकोट तालुका प्रतिनिधी |

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे १४ व १५ जून २०२५ रोजी पार पडलेल्या ‘फिट इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी

ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५’ मध्ये सेंट पॉल्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची लयलूट केली.

Related News

ज्युनियर गटात

  • ओम इंगळे – सुवर्णपदक

  • चेतन घुगे – कांस्यपदक

  • ओम गावंडे – कांस्यपदक

सिनियर गटात

  • वेदांत काकड – सुवर्णपदक

या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चमकदार कामगिरीतून शाळेचा आणि अकोट तालुक्याचा गौरव केला.

या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, तसेच संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, सचिव प्रमोद चांडक,

उपाध्यक्ष लूनकरन डागा, मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी व रिंकू अग्रवाल,

मॅनेजर प्रभुदास नाथे, पर्यवेक्षक अभिजीत मेंढे, क्रीडा शिक्षक अभिलाष काळमेघ व सुयोग कल्पेकर,

तायक्वांदो प्रशिक्षक अनुप चांदणे, तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला दिले आहे.

या विजयानंतर सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/kondoli/

Related News