सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

अकोट | प्रतिनिधी

अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

Related News

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोषाध्यक्षा रेखा चांडक होत्या, तर संस्थाध्यक्ष नवनीतजी लखोटिया,

सचिव प्रमोदजी चांडक, लुनकरणजी डागा, शारदा लखोटिया, सुधा डागा, दीपम लखोटिया, अवनी लखोटिया आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.

त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करत रसिकांची मने जिंकली.

मुख्याध्यापक विजय बिहाडे यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.

त्यांनी नमूद केले की, २ जुलै १९९९ रोजी स्थापन झालेली ही संस्था आज वटवृक्ष बनली असून, येथून शिकून गेलेले विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडमध्ये

  • प्रारब्ध कुलट – 7वा क्रमांक

  • काव्यश्री राऊत – 3रा क्रमांक

  • प्रणित नरवाडे – 5वा क्रमांक

या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सर्टिफिकेट व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच जानवी महल्ले, मंदार थोरात, वेदांत दामदर, विराग उगले, आर्या अढाऊ यांनाही गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात आले.

सानवी कोरडे हिला मेरिट सर्टिफिकेट देण्यात आले.

प्राचार्य व शिक्षकांचा सत्कार

मुख्याध्यापक विजय बिहाडे यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड, तर शाळेला ‘राष्ट्रीय गोल्डन स्कूल अवॉर्ड’ मिळाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.

शाळेतील ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल, अभिजीत मेंढे, जयश्री हिंगणकर यांना बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाले.

तसेच इन्स्पायरिंग टीचर अवॉर्ड प्राप्त शिक्षक –

भारती बघेले, संदेश चोंडेकर, अंजू बन्नवडे, दीपिका डांगरे, शुभम कळसकर, मनीषा रोहनकार, अर्चना रायबोले, मालती महल्ले,

विद्या नळे, पल्लवी पोटे, दीप्ती अग्रवाल, अगस्ती ठाकूर, नितीन गावंडे, पूजा गावंडे, माधुरी शेंडे, धनश्री चौधरी,

अनिता सोनोने, जया लाडोळे, यामिनी पाटील, वैभव हिंगणकर, रोहिणी कोकाटे, भाविका लोणकर, सतीश ठोकळ.

वृक्षारोपणाने समारोप

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये शाळेतील सर्व शिक्षकांनी भाग घेतला.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पल्लवी पोटे व आनंद काळमेघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिल्पा ठाकूर यांनी केले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

सेंट पॉल्स अकॅडमीने गुणवत्तेच्या शिखराकडे वाटचाल करताना शिक्षण क्षेत्रात आदर्श घालून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Read Also : https://ajinkyabharat.com/gajanan-nagari-pastarasthet-motha-economic-non-recruit/

Related News