सेंट पॉल्स अकॅडमीच्या विद्यार्थिनींची सॉफ्टबॉलमध्ये विभागीय स्तरावर झेप

सॉफ्टबॉल स्पर्धेत आश्चर्यकारक झेप

अकोट : अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या आयोजनाखाली जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा 20 सप्टेंबर रोजी वसंत देसाई स्टेडियम येथे पार पडली. या स्पर्धेत सेंट पॉल्स अकॅडमीच्या तीन संघांनी दमदार विजय मिळवून विभागीय स्तरावर निवड मिळवली.14 वर्षे वयोगटातील संघामध्ये कादंबरी पर्वतकार, कृष्णाली नाथे, ईश्वरी शिंगणे, सुरभी घुगे, तुलसी जेस्वानी, श्रावणी पुंडकर, परिधी चौधरी, मॉली मून, धनश्री वानखडे, नेहा रघुवंशी, संस्कृती शेगोकार, समीक्षा राखुंडे, कृष्णाली पुंडकर, संजोत बोडके, समीक्षा भारंबे या विद्यार्थिनींचा समावेश होता.17 वर्षे वयोगटातील संघामध्ये वेदिका जायले, समृद्धी हुतके, विराई चोपडे, माही सोळंके, सृष्टी हुतके, अक्षरा चोटमल, अन्वेशा राजगुरू, आरुषी वालसिंगे, सेजल शिंदे, आर्या वालके, समृद्धी डिक्कर, धनश्री घुगे, काशी देठे, तेजल विश्वकर्मा, अनुजा हरणे, सोनल फुलारी यांचा समावेश होता.तर 19 वर्षे वयोगटातील संघामध्ये दीपश्री महल्ले, ईश्वरी कुलट, हेतांसी इंगळे, माही चरेरे, तुष्मिरा वाघमारे, गौरी रहाटे, ओजस्वी देशमुख, राशी ठाकूर, चंचल अग्रवाल, श्रद्धा मेंढे, खुशी गुप्ता, अश्विनी मेंढे, भक्ति आष्टीकर, गायत्री गरकल, गौरी मेटकर, अदिती रेडे यांचा समावेश होता.या विजयानंतर संस्थेच्या पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. तसेच त्यांच्या यशामागील क्रीडा प्रशिक्षक प्रणव देंडव यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.

read ALSO : https://ajinkyabharat.com/shetkari-sankatachi-serious-axis/