सेंट पॉल्स अकॅडमीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सेंट पॉल्स अकॅडमीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कोट तालुका प्रतिनिधी | 21 जून 2025

स्थानिक सेंट पॉल्स अकॅडमी येथे आज ११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. नवनीत लखोटिया होते.

Related News

कार्यक्रमास प्रमोद चांडक, लूनकरण डागा, रेखा चांडक, शारदा लखोटिया, सुधा डागा यांच्यासह

शाळेचे मुख्याध्यापक मा. विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल,

पर्यवेक्षक अभिजीत मेंढे, सारिका रेळे, मालती महल्ले, प्रशांत मंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी क्रीडा शिक्षक अभिलाष काळमेघ यांनी योगाचे महत्त्व विशद करत भारताच्या प्राचीन परंपरेचा गौरव केला.

क्रीडा शिक्षक सुयोग कल्पेकरअभिलाष काळमेघ यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखवली.

विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत योगासने सादर केली.

शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीही कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष काळमेघ यांनी केले,

तर आभार प्रदर्शन नितीन गावंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

Read Also : https://ajinkyabharat.com/shubman-gilla-icc-cha-dand-penal-dress-dissolis/

Related News