अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या माजी आमदारास महिला
अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भानुदास मुरकुटे
असे आमदाराचे नाव आहे. राहुरी पोलिसांनी सोमवारी
Related News
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून
ताब्यात घेतले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ
उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी
तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी
संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. 2019 पासून मुंबई,
दिल्ली तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा
आरोप महिलेने केला आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस
अॅक्शन मोडवर आले. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे
यांच्यावर आयपीसी कलम 376,328,418,506 अन्वये राहुरी
पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस मुरकुटे
यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र
कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. ते रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात
दाखल झाले. रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिसांनी
मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. याप्रकरणी
पोलीस पुढील तपास करत आहेत. तर या घटनेमुळे
अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/maharashtra-code-of-conduct-in-the-next-two-to-four-days/