कोडोली : श्रीक्षेत्र कोडोली येथील श्री पितांबर महाराज गुरु श्री गजानन महाराज संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत पुरुषोत्तम देव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता सामूहिक ज्ञानेश्वरी पारायनाला सुरुवात झाली असून, या पारायणाचे मुख्य वाचक ह.भ.प. बबन देव महाराज आहेत.सामूहिक पारायणाला परिसरातील महिला-पुरुष, बालगोपाल तसेच मोठ्या संख्येने भाविक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून ज्ञानेश्वरीचे श्रवण करत आहेत. भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण दाटून आले आहे.श्री संत पुरुषोत्तम देव महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात अखंड हरिनाम, काकड आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन, होमहवन, महाअभिषेक व महाप्रसाद या कार्यक्रमांचा समावेश आहे.सप्ताहभर सुरू राहणाऱ्या या धार्मिक सोहळ्याला कोडोलीसह परिसरातील भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, संस्थान परिसर भक्तीमय वातावरणाने निनादत आहे.
सामूहिक ज्ञानेश्वरी पारायनामुळे कोडोली परिसरात भक्तिमय उत्साहाची लाट उसळली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/risod-polesnchi-busted-action/
