श्री सीदाजी महाराज व्यायाम शाळा कावड यात्रा महोत्सवचे आयोजन

श्री सीदाजी महाराज व्यायाम शाळा कावड यात्रा महोत्सवचे आयोजन

पातुर :

पातूर येथील प्रसिद्ध श्री सिदाजी व्यायाम शाळा च्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीही बजरंगी कावड यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

या कावड यात्रेला उज्जैन ओंकारेश्वर येथून जलतीर्थ आणण्यात येते येणाऱ्या श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पातुर शहरात मोठ्या प्रमाणात कावड यात्रेचे स्वरूप राहते.

श्री सिदाजी व्यायाम शाळा कावड यात्रेमध्ये वेगवेगळ्या झाकिया राहतात ते पाहण्याकरिता ग्रामीण भागातून भक्तांची गर्दी उसळते.

ही कावड यात्रा खानापूर रोड, टीकेवी चौक ,जुने बस स्थानक ,संभाजी चौक, गुजरी लाईन चौक,

येथून पातुर येथील प्राचीन काशी कवळेश्वर मंदिर येथे जलभिषेक करण्यात येणार आहे.

उज्जैन ओंकारेश्वर येथून जलतीर्थ आणण्याकरिता मंगेश गाडगे,
अनिल तायडे, आशिष निनाळे ,

शंकर गिरे, कृष्ण काळे, गौरव फुलारी, श्रीकांत राठोड ,चेतन गर्जे यांच्यासह बजरंगी मित्रपरिवाचे युवकांचा सहभाग आहे.

तसेच आगामी सोमवारी लाखो च्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बजरंगी ग्रुप चे मंगेश गाडगे यांनी केले आहे