श्री शिवाजी विद्यालय निंबा यांचा राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत अकोला जिल्ह्याचा सहभाग
निंबा : रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व पुणे जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित सातवी महाराष्ट्र राज्य रग्बी अजिंक्यपद स्पर्धा 2025 पुणे येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत श्री शिवाजी विद्यालय निंबा येथील 17 वर्षाखालील ज्युनियर मुलांच्या गटाने अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
शनिवार, दि. 23 ऑगस्ट रोजी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली.
शारीरिक शिक्षक श्री. सुनील उगले व श्री. रामपाल खचकड यांच्या
विशेष प्रयत्नांमुळे व मार्गदर्शनामुळे विद्यालयाच्या संघाला राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली.
यामुळे विद्यालयाची यशस्वी क्रीडा परंपरा कायम ठेवण्यात आली.
या यशाबद्दल विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. विनोद धांडे व सर्व शिक्षक
वृंद यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
तसेच पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.