“एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत श्री. शिवाजी महाविद्यालयात वृक्षारोपण

🌱 "एक पेड माँ के नाम" उपक्रमांतर्गत श्री. शिवाजी महाविद्यालयात हरित उपक्रम

अकोट – दर्यापूर रोडवरील स्थानिक श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात

कनिष्ठ विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेप्रमाणे तसेच

“एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे व उपप्राचार्य डॉ. संजय कोल्हे

यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात विविध वनस्पतींची लागवड करण्यात आली.

यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. संजय पट्टेबहादुर,

प्रा. प्रफुल्ल देशमुख, प्रा. परीक्षित मेतकर, प्रा. निलेश रहाटे,

प्रा. आशिष वनकर, प्रा. मंगेश अवचट, प्रा. मंगेश राऊत,

प्रा. सौदागर भिसे, प्रा. चेतन चुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वृक्षारोपणात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

उपक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि हिरवाई जपण्याचा संदेश देण्यात आला.

Read also : https://ajinkyabharat.com/sri-gurudev-vidya-mandirat-v-b-bundhe-saranna-bhagya-nirop/