श्री.शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,दर्यापूर रोड,अकोट येथे सध्या सुरू असलेल्या नवदुर्गा उत्सवाचे औचित्य साधून ‘जागर नारी शक्तीचा’ उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पांडे तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.अश्विनीताई देवके मॅडम उपस्थित होत्या.यावेळी उपप्राचार्य डॉ.संजय कोल्हे तसेच क.म.वि पर्यवेक्षक प्रा.संजय पट्टेबहादूर व एच.एस.व्हि.सी प्रमुख प्रा.अर्चना कुचे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.डॉ.अश्विनी देवके यांनी सध्याची नारी अबला नसून सबला आहे,त्यामुळे त्यांचेकडे बघण्याचा सर्वांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे,असे प्रतिपादन केले.मा.प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील कर्तबगार स्त्रियांकडून प्रेरणा घेण्याची सूचना केली.या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी,प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशिष वनकर यांनी तर प्रास्ताविक डॉ.नूतनवर्षा देशमुख केले.आभार प्रदर्शन प्रा.निलेश रहाटे यांनी केले.
read also : https://ajinkyabharat.com/honar-deposited-10-thousand-rupees-for-mahilanchaya/
