श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक

श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक

अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील

पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;

तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषेक करू न महादेवाला पुजले या श्रावण महिन्यानिमित्याने मंदिरच्या बाहेरिल परिसरात यात्रा भरली होती.

Related News

किरकोळ विक्रेत्यांनी तसेच लघु व्यावसायिकांनी विविध गृहपयोगी वस्तू व खेळण्यांची दुकाने थाटली,

तसेच खाद्यपदार्थ विक्रीचेही दुकाने यात्रेत होती. साबुदाणा वडा, साबुदाणा उसळ, बटाटे चिप्स,

गुळपट्टी भाविकांसाठी उपलब्ध होती.तगडा पोलीस बंदोबस्तभाविकांची अलोट गर्दी बघता, कोणतीही अनुचित घटना घडू नये,

यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त केला. श्वानपथकही तैनात करण्यात आले.

Read Also :  https://ajinkyabharat.com/shravanatil-pahlya-sankashtila-gaagav-ganpati-darshanasathi-bhavikanchi-alot-gardi/

Related News