शिरगाव (गोवा) | प्रतिनिधी –
गोव्यातील शिरगाव येथे श्री लैराई देवीच्या वार्षिक यात्रेदरम्यान शुक्रवारी रात्री भीषण चेंगराचेंगरी झाली.
या दुर्घटनेत सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
चारधाम यात्रा करणार सोपी
तामिळनाडूतील मच्छिमारांवर श्रीलंकन लुटारूंचा हल्ला
पाकिस्तान ध्वजावाहक जहाजांना भारतात प्रवेशबंदी
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या पित्याचे राक्षसी रूप
अंतराळात आनंदाचा क्षण!
अकोला: जुना शहर पोळा चौकात युवकावर जीवघेणा हल्ला
अकोला: नवीन उड्डाणपुलावर दुचाकी अपघात
झांसी: डीजे वाजवल्याच्या वादातून गोंधळ
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्समधून ‘या’ 5 खेळाडूंना दाखवला जाईल बाहेरचा रस्ता?;
“भारत युद्ध करेल” भीतीने थरथरलेला पाकिस्तान!
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना : लाडक्या बहिणींनो खुशखबर!
सध्या जखमींवर गोमेकॉ (GMC) आणि मापसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गर्दीचा ताण आणि अचानक गोंधळ
शुक्रवारी रात्री श्री लैराई देवीच्या यात्रेकरिता शिरगावमध्ये राज्यभरातून आणि परदेशातूनही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
यावेळी एका मिरवणुकीदरम्यान अचानक मोठा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
अनेक भाविक एकमेकांवर कोसळले, काहींना श्वास घेण्यास त्रास झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला.
मुख्यमंत्री सावंतांनी घटनास्थळी भेट दिली
घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी नंतर मापसा आणि जीएमसी रुग्णालयात जाऊन जखमी भाविकांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा अधिक जखमी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फोन वरून या घटनेची माहिती घेतली असून केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले आहे.”
राज्यातील पुढील तीन दिवसांचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसकडून श्रद्धांजली व सहवेदना
गोवा काँग्रेसनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “शिरगाव यात्रेतील दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले,
त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.
जखमी भाविकांना लवकर बरे वाटावे, हीच प्रार्थना.”
प्रशासनाकडून अद्याप अधिकृत खुलासा नाही
या चेंगराचेंगरीचे नेमके कारण अद्याप प्रशासनाकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
मात्र प्राथमिक माहितीनुसार, अचानक गर्दी वाढल्यामुळे गोंधळ उडून ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/intestinal-anandcha-moments/