अकोट – तालुक्यातील ग्राम बोर्डी येथील श्री. गुरुदेव विद्या मंदिरचे जेष्ठ शिक्षक व्ही. बी. बुंधे
यांचा सेवापूर्ती सोहळा शाळा समिती, मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत
मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा समितीच्या वतीने अध्यक्ष संदीप महाले यांच्या हस्ते बुंधे सरांचा शाल,
श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर सहकारी शिक्षक,
मान्यवर व विद्यार्थ्यांनी भाषणातून त्यांच्यासोबत घालवलेले संस्मरणीय क्षण आठवून भावना व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांनीही आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप देताना डोळ्यात पाणी आणले.
कार्यक्रमासाठी तुळशीराम इस्थापे, सुभाष लटकुटे, देविदास बुले, लक्ष्मीनारायण जयस्वाल,
दीपक आतकड, बी. जी. बुंधे, गणपत पखाले, गणेश वाघमारे, सुनिल जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक राठोड यांनी केले.
सूत्रसंचालन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जयस्वाल सर यांनी मांडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका बद्रे मॅडम, अमोल महाले, रवी कुरई, हरिभाऊ शिवरकर यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या भावपूर्ण सोहळ्यात सर्वांनीच बुंधे सरांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Read also : https://ajinkyabharat.com/gst-2025-madhyal-badalantar-clear-picture/