कारंजा (प्रतिनिधी) –
श्री गुरु शिवलिंग स्वामी मठ संस्थान (सद्यः श्री सद्गुरु शिवायनमः मठ संस्थान), कारंजा,
जिल्हा वाशिम येथे भव्य आणि दिव्य लोकार्पण समारंभ रविवारी दिनांक २० जुलै २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला.
या मठात सुसज्ज सभागृह उभारण्यात आले असून, या सभागृहासाठी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण
मंत्री मा. ना. श्री. संजयभाऊ राठोड यांनी वार्षिक नगरोत्थान निधीतून आवश्यक निधी मंजूर केला होता.
त्यानुसार भव्य सभागृहाची बांधकाम प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचे लोकार्पण करण्यात आले.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ. सईताई डहाके श्री. आमदार हरिष आप्पा पिंपळे
श्री. दत्ताराज डहाके, श्री. जयकिशन राठोड सौ. प्राजक्ता माहितकर आणि श्री. महेश वाघमोडे यांची उपस्थिती लाभली.
या सोहळ्याला शुभ आशीर्वाद श्री व.ब.र. १०८ मारुलसिद्ध शिवाचार्य महाराज (मठाधिपती) यांचे लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. सौ. सईताई डहाके यांनी भूषवले.
प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मठातील सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन विश्वस्त व समस्त भक्तमंडळींनी केले होते.
मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहून हा सोहळा भव्यतेत अनुभवला.
Read Also : https://ajinkyabharat.com/tanatanavamu/