पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विराट कोहलीकडून खास शुभेच्छा

ऑलिम्पिक

येत्या 26 जुलैपासून फ्रान्समध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे.

भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीने देशभरातील खेळाडूंना

मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related News

याबाबत त्याने एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया

हँडल वर आपलोड केला आहे.

कोहलीने त्याच्या चाहत्यांना खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

देशाचा अभिमान आणि एकतेच्या महत्त्वावर जोर देऊन

भारताच्या गौरवासाठी प्रयत्न करा,

असे विराटने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

“आपले भाऊ आणि बहिणी पॅरिसला निघाले आहेत,

पदकांसाठी भुकेले आहेत. आपल्यातील एक अब्ज लोक त्यांना

चिंताग्रस्त आणि उत्साहित पाहत असतील कारण आपले खेळाडू

ट्रॅक, मैदानात, कोर्ट, रिंगमध्ये पाऊल टाकणार आहेत.

भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून भारत, भारत, भारत असा जयघोष करत

तिरंगा उंचावलेला दृढ निश्चित दिसतील असे विराटने म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/pakistan-government-increased-problems-for-imran-khan/

Related News