जामनी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी
कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व
सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी
ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत
पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार
आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच
मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून
शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण
निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या
लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात
विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना
बाजार समितीत धान्याची आवक दिसून येत नाही. आता शेतकऱ्यांना
नव्या सोयाबीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. यंदा ऑक्टोबर महिना
अर्धा उलटून गेला तरी वरुणराजा शांत व्हायचे नाव घेत नसल्याने सोयाबीन
उत्पादकांना सोयाबीनचे उत्पादन घरी आणण्यासाठी तारेवरची कसरत
करावी लागत आहे. हल्ली जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन सवंगणीला
आले आहेत. तर ज्यांचे सोयाबीन मळणीला आले आहे त्यांना वरुणराजा
सतावत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/teesri-aghadi-150-jaga-ladhanar/