सोयाबीन, तूर, कपाशीचे प्रचंड नुकसान – शेतकरी आर्थिक संकटात

रिसोड तालुक्यात पावसाचे थैमान

रिसोड तालुक्यात पावसाचे थैमान

रिसोड :  तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या अति पावसाने तालुक्यातील बिबखेडा, कवठ, किनखेडा, केशवनगर यांसह अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढले.याआधीच अति पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यात आता पुन्हा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.सखल भागांत पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले असून ते आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडले आहेत.ग्रामस्थ व शेतकरी प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

read also : https://ajinkyabharat.com/morna-radiil-pulacha-question-aranivar-gramsthana-fury/