दानापूर येथे संघर्ष क्रिकेट क्लबच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युवानेते सुजातदादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. या भव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ₹31,111 माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौदळे व सरपंच सौ. सपना धम्मपाल वाकोडे यांच्या वतीने देण्यात आले. द्वितीय पारितोषिक ₹21,111 स्वर्गीय रामकृष्ण वानखडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी सरपंच महादेवराव वानखडे व ग्रामपंचायत सदस्य योगेश येऊल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तृतीय पारितोषिक प्रेस क्लब अध्यक्ष भगवान हागे व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल खोणे यांनी दिले. याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत शिवनेरी क्रिकेट क्लब, आकोट यांनी शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर संत गजानन क्रिकेट क्लब, शेगाव यांनी उपविजेतेपद मिळवले. सर्व पारितोषिकांचे वितरण संबंधित बक्षीसदात्यांच्या हस्ते करण्यात आले.
बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच साहेबराव वाकोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील इंगळे, प्रकाश खोब्रागडे, नरेश बांगर, जीवन बोदडे, पंजाब तायडे, संदीप कांबळे, राहुल वाकोडे, गोपाल विरघट, संजय तायडे, संतोष हागे, अफसर खान, विनोद विरघट (आयकर अधिकारी), धम्मपाल वाकोडे यांच्यासह गावातील मान्यवर व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वाकोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोपाल विरघट यांनी मानले. संघर्ष क्रिकेट क्लब, दानापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
