अकोला : श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, अकोला. येथे दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी डाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.केशव गोरे यांनी केले.तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.केतन वाकोडे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.संकेत काळे,तर प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.केशव गोरे, कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ग्रंथालय विभागाच्या ग्रंथपाल डॉ.दिपाली देशमुख,डॉ.सुगत मोहोड उपस्थित होते,तर महाविद्यालयातील.डाॅ.कविता कावरे ,प्राध्यापक.नवनाथ बडे,प्रा.डॉ.बळवंत पाटील प्रा.मनोहर वागतकर,प्रा.पी.आर पाचपुते,प्रफ्फुल पावर,प्राध्यापक वृंद व शिक्षक व शिक्षकेत्तर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.