तेल्हारा :सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत आईच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त परघरमोल कुटुंबाने विविध शाळांना शैक्षणिक साहित्य देऊन एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.भिमराव परघरमोल (व्याख्याता तथा अभ्यासक, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा, तेल्हारा जि. अकोला) यांच्या आईचा स्मृतिदिन १९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवला.
विद्यार्थ्यांसाठी खास भेटवस्तू
नगरपरिषद शाळा क्र.२, तेल्हारा येथे ३२ इंची एलईडी टीव्ही देऊन विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला हातभार लावला.जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, उकळी बु. आणि मराठी प्राथमिक शाळा, सावळा (ता. संग्रामपूर) येथे विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाला मुख्याध्यापक सिद्धार्थ तायडे, रवींद्र खुमकर, शिवाजी पवार, वंदना व्यवहारे, शितल वाघमारे (परघरमोल) यांसह सामाजिक कार्यकर्ते विलास पोहरकर, प्रवीण पोहरकर, मंगेश गवई, पत्रकार पंकज भारसाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पवार शिक्षकांनी केले, तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ तायडे मुख्याध्यापक यांनी मानले.
परघरमोल कुटुंबाचा हा स्तुत्य उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला असून समाजकारणात नवे आदर्श घालून देणारा आहे.
read also : https://ajinkyabharat.com/ind-vs-pak-irfan-pathanwar-personal-halla-declaration-shigela/
