पुणे : नेहमीच आपल्या ठसकेबाज अदांनी चाहत्यांना वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भर पावसात तिने नेहा कक्करच्या ‘Tu Pyaasa Hai’ या गाण्यावर तुफान डान्स सादर केला असून, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.ब्लॅक टी-शर्ट आणि ब्ल्यू जीन्समध्ये गौतमीचा पावसाळी अंदाज नेटकऱ्यांना अक्षरश: भुरळ घालत आहे. चाहत्यांनी तिच्या या डान्स व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला असून, तिच्या नृत्यशैलीचं कौतुक केलं जात आहे.
गौतमी पाटीलने आतापर्यंत अनेक गाणी आणि चित्रपटांतून आपली नृत्यकला सादर केली आहे.
‘कृष्ण मुरारी’ या गवळणीतून तिने प्रथमच मंचावर गवळण सादर केली होती.
‘तंबू पिरमाचा पेटला’ (आंबट शौकीन) या गाण्यातील तिच्या ठसकेबाज अदांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
‘बापाचा बाप येतोय’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजलं.
‘चंद्रावानी रूप माझं नजरा लावू नका’ (घुंगरु चित्रपट) आणि ‘सरकार तुम्ही केलाय मार्केट जाम’ या गाण्यांमधील तिच्या मोहक लावणी शैलीने रसिक मंत्रमुग्ध झाले.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा गावची रहिवासी असलेली गौतमी कठीण परिस्थितीतून पुढे आली आहे. अकलूज लावणी महोत्सवात बॅकडान्सर म्हणून तिचा पहिला कार्यक्रम झाला, त्यासाठी तिला फक्त 500 रुपयांचं मानधन मिळालं. त्यानंतर पुण्यातील लावणी अकॅडमीमध्ये तिने प्रशिक्षण घेतलं आणि आज ती महिन्याला तब्बल 22 ते 25 कार्यक्रम करते. प्रत्येक कार्यक्रमासाठी सुमारे 2 लाख रुपये मानधन घेते.गौतमीच्या संघर्षमय वाटचालीतून आणि मेहनतीतूनच ती आज महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना बनली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/shetkayancha-debt-debt-karani-magani/
