बिग बॉस 19’मधील अभिनेत्री कुनिका सदानंद आणि गायक कुमार सानू यांचे जुने अफेअर पुन्हा चर्चेत आले आहे. कुमार सानूच्या मुलाने, अयानने, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून कुनिकावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
व्हिडीओमध्ये अयान म्हणतो की, “खरं बोलल्याने मन हलकं होतं, पण खोटं बोलल्याने अनेक खोट्या गोष्टी तयार कराव्या लागतात. माझ्या आईने अशा आयुष्य जगले नाही ज्यामुळे मला प्रतिमा सुधारावी लागेल. वडिलांचं मी सांगू शकत नाही, पण आईने काहीच चुकीचं केले नाही.”
अयानने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘डॅमेज कंट्रोलसाठी पीआर प्रचार. अत्यंत जुनी कथा’ असा उल्लेख केला असून हॅशटॅगमध्ये बिग बॉसचा उल्लेखही केला आहे. या प्रकरणामुळे कुनिका सदानंद आणि त्यांच्या खासगी आयुष्याची पुन्हा चर्चा रंगली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/nationalist-sharad-pavrancha-devabhau-campanla-north/