सर्पदंशामुळे १९ वर्षीय रूपालीचा मृत्यू; पळसोबढे गावात शोककळा

सर्पदंशामुळे १९ वर्षीय रूपालीचा मृत्यू; पळसोबढे गावात शोककळा

प्रतिनिधी | अकोला | २२ जुलै २०२५

अकोला तालुक्यातील पळसोबढे येथील १९ वर्षीय रूपाली गोवर्धन खांडेकर हिला झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

१७ जुलै रोजी रात्री झालेल्या या घटनेने संपूर्ण गावाला हादरवून टाकले आहे.

घटनेच्या दिवशी रूपाली रात्री झोपेत असताना हाताच्या बोटावर काहीतरी चावल्याची तीव्र वेदना जाणवली.

ती जागी झाल्यावर समोरच विषारी साप (मण्यार) दिसल्याने घरात एकच खळबळ उडाली.

नातेवाईकांनी तिला तातडीने अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं.

पाच दिवस मृत्यूशी झुंज, पण…

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीअंती विषारी मण्यार सापाचा दंश झाल्याचे स्पष्ट केले.

रूपालीने तब्बल पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली.

नातेवाईक, गावकरी आणि रुग्णालयातील डॉक्टरांनीही तिला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले.

मात्र, २१ जुलै रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सुसंस्कृत, सुस्वभावी आणि कष्टाळू रूपाली…

रूपाली ही अत्यंत सुसंस्कृत, सुस्वभावी आणि कष्टाळू मुलगी होती.

तिच्या जाण्याने गावातील प्रत्येक घर दुःखात बुडाले आहे.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गावात एक शोकाकुल वातावरण पसरले आहेत.

सर्पदंश प्रतिबंधासाठी जनजागृती गरजेची

या दुर्दैवी घटनेनंतर सर्पदंशासंबंधी जनजागृती, घरे सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता,

तसेच तातडीने वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी

गावागावात प्राथमिक सुविधा असणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/nirguna-nadila-motha-pur/