सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल

सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल

बार्शीटाकळी /प्रतिनिधी

बार्शीटाकळी तालुक्यातील निहीदा येथील युवा शेतकरी अतुल बाळु ठाकरे वय अं.30 वर्ष रा.निहीदा यांना सर्पदंश झाल्याची

माहीती पिंजर येथील योगेश आप्पा विभुते यांनी संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक

Related News

दिपक सदाफळे यांना दीली तेव्हा लगेच योगेश विभुते यांना सर्पदंश झालेल्या जागेचा फोटो मोबाईल वर पाठविण्याची विनंती केली.

तेव्हा आलेला फोटो पाहताच मण्यार जातीच्या सापाची बाईट असण्याची शक्यता नाकारता येत असल्याची शंका लक्षात घेता क्षणाचाही विलंब

न करत आपले सहकारी मयुर सळेदार यास रुग्णवाहिकेसह तात्काळ रवाना केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र पिंजर येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.काजल काळे यांनी उपचार करून तात्काळ अकोला

जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी जाण्याचे सांगीतले 40 ते 45 मिनटात रुग्णाला धिर देत अकोला येथील जिल्हा

रुग्णालयात दाखल केले येथील डाॅक्टरांनी रुग्ण धोक्या बाहेर असल्याचे सांगताच नातेवाईकांनी आनंद व्यक्त करत

पथकाचे आभार मानले अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/student-2/

Related News