स्मृती मानधना ठरली टीम इंडियासाठी तारणहार

मातृभूमीवर

मातृभूमीवर झळकावले पहिले शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने अनोखी कामगिरी केली आहे.

भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृतीने द. आफ्रिकाविरूद्धच्या

Related News

वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले आहे.

बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या

तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात मानधनाने वन डे कारकिर्दीतील

सहावे शतक ११६ चेंडूत झळकावले.

या शतकी खेळाच्या जोरावर एकेकाळी ९९ धावांवर पाच विकेट गमावलेल्या

टीम इंडियाने २६५ धावा उभारल्या.

मंधानाने १२७ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली.

मानधनाच्या खेळीमुळे भारताने ५० षटकांत आठ गडी गमावून २६५ धावा करत

दक्षिण आफ्रिकेसमोर २६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

घरच्या मैदानावर मानधनाचे हे पहिले वनडे शतक आहे.

याआधी तिने वन-डेमध्ये परदेशी भूमीवर पाच शतके झळकावली होती.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.

शेफाली वर्मा ७ धावा केल्यानंतर, दयालन हेमलता १२ धावा,

कर्णधार हरमनप्रीत कौर १० धावा, जेमिमाह रॉड्रिग्स १७ धावा

आणि यष्टिरक्षक रिचा घोष ३ धावा करून बाद झाल्या.

यानंतर मंधानाने दीप्ती शर्मासोबत सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली.

दीप्ती ४८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३७ धावा करून बाद झाली.

ही भागीदारी अयाबोंगा खाकाने दीप्तीच्या गोलंदाजीवर मोडून काढली.

यानंतर मानधनाने पूजा वस्त्राकरसोबत सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली.

१२ चौकार, १ षटकार : स्मृतीची धडाकेबाज खेळी मानधनाला सुने लुउसने झेलबाद केले.

तिने आपल्या खेळीत ११७ धावा केल्या.

आपल्या खेळीत तिने १२ चौकार आणि एक षटकार लगावला.

याशिवाय पूजाने ४२ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावांची खेळी केली.

राधा यादव सहा धावा करून बाद झाली.

तर आशा शोभना आठ धावा करून नाबाद राहिली.

दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने तीन,

तर मसाबत क्लासने दोन गडी बाद केले.

त्याचवेळी अनेरी डेर्कसेन, नोनुकुलुलेको मलाबा आणि नॉन्डुमिसो शांगासे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Read also: पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात. (ajinkyabharat.com)

Related News