कौशल्यपूर्ण खेळीने महाराष्ट्राचा लौकिक उज्ज्वल

राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत सुवर्ण विजय

 

मलकापूर (जि. बुलढाणा) : मलकापूर येथे पार पडलेल्या 32 वी मुलं व 25 वी मुली 14 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व संग्रामपूर तालुक्यातील सोहम राम सावतकार व रणजीत नरेंद्र ठाकरे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने संघभावना, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला. कौशल्यपूर्ण व चित्तथरारक खेळीमुळे प्रेक्षकांनी खेळाडूंना दाद दिली.या सुवर्ण विजयामुळे महाराष्ट्र राज्याचा आट्यापाट्या खेळातील लौकिक आणखी उजळला असून संग्रामपूर तालुक्यात जल्लोषाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी व चाहत्यांनी महाराष्ट्र संघाच्या कामगिरीचे कौतुक करत दोन्ही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/bodkha-shet-shivaratun-shetkyancha-motor-pump-chortiyani-lampas/