SIT ची स्थापना, रोहित पवारांचा पाठिंबा

सिडको प्रकरणावर SIT ची चौकशी – रोहित पवारांचा निर्धार

सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार, सरकारकडून SIT ची स्थापना; रोहित पवारांनी घेतला स्वागतनवी मुंबईतील सिडकोकडून सुमारे 5 हजार कोटी रुपयांच्या सरकारी वनजमीन बळकावण्याच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने SIT (Special Investigation Team) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हटले आहे की, “हा निर्णय सिडको जमीन घोटाळ्यातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे.” त्यांनी सामाजिक संघटना आणि स्थानिक भूमिपुत्रांचे अभिनंदन करत म्हटले की या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.

12 हजार पानांचे पुरावे; भ्रष्टाचार्यांना मोकळं सोडणार नाही

रोहित पवार यांनी सरकारकडून SIT स्थापन होण्याचे स्वागत करत स्पष्टपणे सांगितले की त्यांनी 12 हजार पानांचे पुरावे सुपूर्द केले असून सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीनेही चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांना पत्र दिले आहे. मात्र, मागील SIT चा इतिहास बघता वेळ मारण्याचे प्रकार झाले आहेत, पण या प्रकरणात कोणताही भ्रष्ट माश सुटणार नाही.

बिवलकर देश सोडण्यापूर्वी लुकआउट नोटीस आवश्यक

आरोपी नंबर 2 बिवलकर महाराष्ट्रात असून लवकरच देश सोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती असून त्याला लुकआउट नोटीस जारी करून अटक करणे गरजेचे असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. त्यांनी मुख्यमंत्रींना स्पष्ट सवाल केला –“भ्रष्ट मंत्री राजीनामा करतील की संरक्षण देऊन राज्याला लुटण्यास मोकळं सोडतील?”

रोहित पवार यांचा दृढ निर्धार

रोहित पवार म्हणाले, “या प्रकरणात न्यायालयीन चौकशी त्वरित पार पाडून स्थानिक भूमिपुत्र आणि कुळधारकांनी कुठलीही काळजी करू नये. आम्ही हा मुद्दा मार्गी लावणारच.”

READ ALSO : https://ajinkyabharat.com/bill-gateschi-important-declaration/