विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबद्दल गोडी निर्माण व्हावी, तसेच विविध वैज्ञानिक प्रतिकृती प्रत्यक्ष अनुभवता याव्यात, यासाठी सर सी. व्ही. रमन फिरते विज्ञान प्रदर्शन, रमन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ नागपूरचे फिरते विज्ञान प्रदर्शन मुर्तिजापूर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजी शालेय प्रांगणात पाहायला मिळणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनाचे आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकोला एज्युकेशन सोसायटीचे संचालक विनायकराव वारे सर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून मोनाली सौंदळे , विज्ञान समन्वयक बीआरसी मुर्तिजापूर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अनिल देविकर आणि शाळेचे पर्यवेक्षक दिनेश बकाले ,तसेच ज्येष्ठ विज्ञान शिक्षक मनोज दीक्षित उपस्थित होते.
विज्ञान केंद्र नागपूरकडून शुभम अजमिरे (टीम लीडर) आणि सावन राठोड (टेक्निशियन) या प्रकल्पासाठी मुख्य उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश म्हणजे मुर्तिजापूर तालुक्यातील तसेच शहरातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील नव्या शोधांशी प्रत्यक्ष ओळख करून देणे, आणि त्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण करणे.
Related News
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश शेगोकार यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत राठोड यांनी सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विविध प्रयोग, वैज्ञानिक प्रतिकृती आणि तारामंडळाबद्दल माहिती पाहता येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राची खरी झलक अनुभवता येईल. विज्ञान केंद्राने विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
