सोमवार, २२ सप्टेंबर रोजी पहाटे ४ ते ८ वाजता सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटीसदृश अतिवृष्टीने मोठी हानी झाली आहे. सिंदखेड राजा आणि सोनोशी मंडळातील नागरिकांना सर्वाधिक फटका बसला असून, गावभर पाणीच पाणी साचले आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या दशकभरात असा पाऊस कधीच झाला नाही.अतिमुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रुमना गावात तर रस्त्यांवरून दोन ते अडीच फूट पाणी वाहत होते, ज्यामुळे गावाला पुराचे स्वरूप आले होते. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंडळ अधिकारी आणि तलाठीही उपस्थित होते.नुकसानग्रस्तांनी आपल्या संकटाची माहिती अधिकाऱ्यांसमोर मांडली, आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचेही पाहिले गेले. या भागातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ मदत आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून या मागणीची दखल घेऊन लवकरच योग्य ती मदत केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/damagatcha-dhoka-vadhala/