बिहार येथील सिध्दनाथ मंदिरात चेंगराचेंगरी

सात जणांचा मृत्यू, नऊ जखमी 

बिहार येथील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदमपूर येथील बाबा सिध्दनाथ मंदिरात

सोमवारी पहाटे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अद्याप सात जणांचा मृत्यू झाल्याची

Related News

माहिती समोर आली आहे. तर एकूण नऊ जण जखमी झाले आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी हजारो भक्त सिध्दनाथ बाबा मंदिरात

दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळीस अचानक मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली.

या घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले

अशी जेहानाबाद येथील पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही या सर्व गोंष्टीवर लक्ष ठेवून आहे.

दिवाकर कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळी डीएम आणि एसपी यांनी

घटनास्थळी भेट घेतली आहे. ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

एकुण सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawarani-dili-ageet-kolhapur-theater-hall-suffered-loss/

Related News