महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत
शिंदे हे त्यांनी पत्नीसह प्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिराच्या
गाभाऱ्यात प्रवेश केल्याने नवा वाद सुरु झाला आहे. कारण
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
महाकालेश्वरच्या गाभाऱ्यात सर्वांना प्रवेश बंदी करण्यात आली
आहे. गेल्या एक वर्षापासून हा नियम बनवण्यात आला आहे. पण
तरी देखील बाबा महाकालाच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आल्याने
भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. सर्वांना या गाभाऱ्यात प्रवेश
मिळावा अशी मागणी सर्वसामान्य भाविकांकडून केली जात आहे.
व्हीआयपी भाविकांना गर्भगृहात प्रवेश देण्यात आल्याने भाविक
संतापले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि श्री महाकालेश्वर
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीरजकुमार सिंह यांनी कारवाई
केली जाईल, असे सांगितले आहे. गुरुवारी सायंकाळी खासदार
श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नीसह आणि इतर अन्य दोन व्यक्तींसह
श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी श्रीकांत
शिंदे यांनी गर्भगृहात जाऊन बाबा महाकालची पूजा केली. नियम
मोडल्याने त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी कुटुंबासह गर्भगृहात बाबा महाकाल
यांचे आशीर्वाद घेतले. या दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
होत आहेत. या प्रकरणावर जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी
सांगितले की, खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना
गर्भगृहात प्रवेश दिला गेला नाही. हे लोक गर्भगृहात कसे पोहोचले
याचा तपास केला जाईल. दररोज होणाऱ्या गर्दीमुळे श्री
महाकालेश्वर मंदिराची दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.
सर्वसामान्य भाविकांना 50 फूट अंतरावरून बाबा महाकालाचे
दर्शन दिले जात होते. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार
असा नियम बनवण्यात आला होता. तरी व्हीआयपी भाविकांना
गर्भगृहातून दर्शन दिले जाते. यामुळे सर्वसामान्य लोकांनी यावर
संताप व्यक्त केला. खासदार श्रीकांत शिंदे हे श्री महाकालेश्वर
मंदिराच्या गाभाऱ्यात कसे पोहोचले याची माहिती घेण्यासाठी
महाकालेश्वर मंदिराचे प्रशासक गणेश धाकड यांना फोन केला
असता त्यांचा फोन बंद होता.
Read also: https://ajinkyabharat.com/pune-hyderabad-schools-high-ranking-dignitary-disobedience/