श्रींचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराजांचा पायदळ वारी पालखी सोहळा श्री श्रेत्र पंढरपूर ते श्री श्रेत्र अकोली (जहाँगीर) आषाढ वारी परतीचा प्रवास

श्रींचे पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराजांचा पायदळ वारी पालखी सोहळा श्री श्रेत्र पंढरपूर ते श्री श्रेत्र अकोली (जहाँगीर) आषाढ वारी परतीचा प्रवास

अकोट

आषाढी वारी पूर्ण करून सर्व संत वारकरी पालखी दिंड्यासह परतीच्या मार्गाला लागत

असतांना प्रत्येक वारक-यांच्या मुखातून जड अंतःकरणाने

“कन्या सासुरासी जाये|मागे परतोनियां पाहे||

तैसें झालें माझ्या जीवा|केव्हां भेटसी केशवा||

हा अभंग गात वारकरी मंडळी परतीच्या प्रवासाला लागतात.

त्याचप्रमाणे श्री संत भास्कर महाराज यांचा पालखी सोहळा सुद्धा श्री श्रेत्र पंढरपूर येथील वारी पूर्ण करून १५ जूलै

ला परतीच्या प्रवासाला मार्गस्थ होत असतांना चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटामध्ये ‘वै. श्री संत वासुदेवजी महाराज’ यांचे

अग्नीसंस्कार स्थळाचे पूजन तथा दर्शन करून अकोली जहाँगीरच्या दिशेने वाटचाल करत निघाला.

थळचे बालयोगेश श्री संत गजानन महाराज शेगांव, यांचे अंतरंग प्राणप्रीय पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराजांचा पालखी सोहळा,

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर वारी जाणे व परत येणे असा १३०० किमी चा पायी प्रवास करत करत पूर्ण करून

दिनांक २५ जुलै रोजी संत नगरी अकोट येथे दाखल झाला. २६ जुलै ला सकाळी “श्री संत वासुदेवजी महाराजांचे निवासस्थान”

अकोट येथे पालखी सोहळ्याचे स्वागत व पुजन झाले. शहरात ठिकठिकाणी स्वागत व पुजन होत पालखी सोहळ्याचे

श्रींची जन्मभुमी श्री क्षेत्र आकोली (जहाँगीर) ला आगमन झाले असता भाविक भक्तांकडून ठिकठिकाणी पुजन व स्वागत करण्यात आले.

शिवाजी नगर, अकोली (जहाँ) येथील श्री मधुकरराव साबळे यांचेकडे श्रींचे पुजन तथा विणेकरी यांच्यासह वारकऱ्यांचे स्वागत

व पुजन होऊन वारक-यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.श्रींची पालखी पुरातन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर,

येथे पोहचताच श्रींचे जयघोषाने व पुष्पवर्षावाने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.श्री संत भास्कर महाराज चॅरिटेबल ट्रस्ट,

संस्थेचे, संस्थापक अध्यक्ष श्री.ह.भ.प.अशोक महाराज जायले,यांनी श्रींच्या पालखी सोहळ्याचे समारोपीय किर्तन विशद करीत असताना.

त्यांनी संस्थेचे प्रत्येक कार्य श्री संत वासुदेवजी महारा‌ज यांच्या आशीर्वादाने पूर्णत्वास जात आहे, हा आपला स्वानुभव आहे.

असे भावोद्गार काढले. तसेच पालखी सोहळ्याचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेत असलेल्या व सहकार्य करणाऱ्या संस्थेचे विश्वस्त

मंडळ आणि सर्व निष्ठावान महाराज मंडळीसह वारकरी तथा सेवाधारी,अन्नदाते,दानशूर मंडळींचे मनःपूर्वक आभार मानले.

अशाच प्रकारे महाराजांचे प्रत्येक कार्यात आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे.अशी विनंती अधिक सुचना सुद्धा केली.

तसेच १३०० किमी.चा पायी प्रवास करून येणाऱ्या वारकऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.त्याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त वारकरी व गावातील

भाविक भक्त उपस्थीत होते.सदर पालखी सोहळा श्री संत वासुदेवजी महाराजांच्या अकराव्या पिढ्यांची परंपरा तेवत ठेवनारा असून

अनेक वर्षापासुन महाराजांचे आशिर्वादीत प्रेरणने स्थापीत श्री संत भास्कर महाराज चॅरिटेबल ट्रस्ट र.नं. ई.५२९ श्री श्रेत्र आकोली

(जहाँगीर) द्वारा आयोजित करण्यात येत आहे.विशेष म्हणजे या पालखी सोहळ्यामध्ये चालणारे वारकरी व अन्नदाते सुद्धा वंश परंपरागत

आपली सेवा गेल्या अनेक वर्षापासून रुजू करीत आहेत.उपरोक्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.ह.भ.प.अशोक महाराज जायले,

आजतागायत निष्काम भावनेने त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहित तीन पिढ्यांसह व समस्त विश्वस्त मंडळ हा पालखी सोहळा

निष्ठेने सांभाळत आहे.त्यांच्या सोबत संस्थेचे विश्वस्त भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ, पालखी सोहळा संचालक विनेकरी

श्री ह.भ.प. मोहन महाराज रेळे,श्री नागोराव महाराज चौखंडे,श्री आत्माराम महाराज वाकोडे,श्री शरद महाराज खंडारे,

श्री प्रकाश महाराज नेव्हारे,श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक,श्री निलेश महाराज जाणे,श्री सोपान महाराज लोखंडे,

श्री सुरेश महाराज मानकर,श्री मंगेश महाराज ठाकरे,श्री हरिदास महाराज वसू,श्री गोपाल महाराज फोकमारे,

श्री अविनाश महाराज कडु,श्री विठ्ठल महाराज केंद्रे,श्री सुदाम महाराज आगरकर,श्री सुधाकरराव जायले,

मृदंगाचार्य श्री अवधूत महाराज थोरवे,शिवा महाराज बारस्कर,श्री धनंजय महाराज जायले,श्री शिवा महाराज रेचे,

आदि अनेकानेक महाराज मंडळींच्या सहकार्याने हा सोहळा अव्याहत सुरळीतपणे चालवीत आहेत.

विशेष म्हणजे या पालखी सोहळ्याची हिरक महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना दिसत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/gai-buhanyachaya-sakhvarun-dalit-youth/