शिवपूर येथे श्री विठ्ठल कथा संकिर्तन ज्ञानयज्ञ सोहळा

विठ्ठल कथा

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम शिवपूर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा समर्थ सदगुरु श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य श्री विठ्ठल कथा संकीर्तन व ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. हा सोहळा दिनांक २५ जानेवारी २०२६ पासून १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सात दिवस चालणार असून, कथा वाचक ह.भ.प. हिरालाल महाराज काळमेघ, कासली, अकोला यांच्या अमृतवाणीतून कथेचे श्रवण भक्तांना होईल.

या दिव्य सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, दुपारी विठ्ठल कथा, सायंकाळी हरिपाठ, आणि रात्री हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळाही सोहळ्यात पार पडणार आहे. प्रत्येक दिवस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरीओम महाराज वाकोडे, विष्णु महाराज रावणकार, रामकृष्ण महाराज आंबूसकर, त्र्यंबक महाराज आवारे, अरुण महाराज लांडे, गणेश महाराज शेटे, अतुल महाराज बोर्डे यांचे हरिकीर्तन भक्तांना ऐकायला मिळेल.

सोहळ्याच्या समारोप दिवशी दिनांक १ फेब्रुवारी २०२६, ह.भ.प. गजानन महाराज गोंडचर यांचे काल्याचे किर्तन होईल आणि नंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद सुरू होणार आहे. या पवित्र आणि आध्यात्मिक सोहळ्यात सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे गावकरी मंडळी कळवित आहेत.

या सप्ताहिक कार्यक्रमातून भक्तांना विठोबाच्या अद्वितीय उपासनेचा अनुभव घेता येईल आणि संतांची अमृतवाणी आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/channi-police-action-against-two-accused-of-illegally-transporting-petrol/